श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ दूर तरी दूर तरी… जवळ ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
दूर तू तेथे
मी मात्र येथे
तरी मी आत्मानंदात
डुंबतो येथे…
जाग येताच
मनोमनी घालीतो दंडवत,
चरणस्पर्ष करून
दिनक्रमाची करितो सुरवात…
कर्म ते आवश्यक
करीतो कृष्णार्पण
फलापेक्षा नच मज
सद्गुरू करी पाठराखण…
क्षण न ऐसा एक
विस्मरण ते सदगुरुंचे
देहभान विसरून
गातो स्तवन तयांचे..
अष्टौप्रहर मी
मानस सानिध्यात
सांगा बरं मी
दूर दूर कसा?
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈