सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

गीता जन्म दिन ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(गीता जयंती विशेष -11 दिसंबर 2024)

जन्म झाला गीतेचा,

कुरुक्षेत्री युद्ध स्थळी !

कृष्ण अर्जुनाचे नाते,

उमगले ते त्यावेळी !

*

अर्जुन झाला हतबल,

कृष्णास ते पाहवेना!

उपदेश पार्थास देता,

मधुसूदनास राहवेना !

*

जन्म दोहोंचे जाहले,

विशिष्ट अशा हेतूने !

महाभारत ते घडले,

परब्रम्हाच्या साक्षीने!

*

बालपण तुझे कृष्णा,

गोकुळी खेळात रंगले!

गोकुळ सोडूनी जाता ,

कर्तव्यास तू वाहून घेतले!

*

 द्रौपदी होती मनस्विनी,

तशीच ती स्वाभिमानी!

नकळत तिच्या कृत्याने,

 झाली युध्दास कारणी !

*

कोणास जाणीव होती,

भविष्यात काय घडेल?

असहाय होता हे जाणून,

घडणारे कधी न चुकेल !

*

गीता धर्म सांगताना ,

अठरा अध्याय वदले!

ज्ञानामृत ते देताना ,

मागे काही न राखले !

*

गीता निरंतर मार्गदर्शक ,

पठण करू या गीतेचे !

सर्वांसाठी लाभदायक,

सार्थक होईल जन्माचे !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments