☆ त्रिवार वंदन… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
आज १२ जानेवारी .. स्वामी विवेकानंद यांची जयंती ..
त्यांना ही काव्य-पुष्पांजली श्रद्धापूर्वक अर्पण – – –
☆
करितो नमन । त्रिवार वंदन।
भारत नंदन | नरेंद्रासी ।। धृ ॥
*
भूवनेश्वरी मां। विश्वनाथ पिता।
जन्म कोलकाता। नरेंद्राचा || ०१ ||
*
शोध अद्वैताचा । गुरू रामकृष्णा।
भागविली तृष्णा । नरेंद्राची|| ०२ ||
*
भारत भ्रमण । विचार श्रवण ।
शुद्ध आचरण । नरेंद्राचे ।। ०३ ।।
*
शिकागो सभेत । मिळविली दाद।
बंधुभावा साद | नरेंद्राची ।। ०४ ।।
*
शिवाचे आगार । आत्मसाक्षात्कार ।
दिला हा विचार | नरेंद्राने || ०५ ।।
*
कर्म भक्ती ज्ञान । आणि राजयोग।
हेची सारे जग । नरेंद्राचे ।। ०६ ।।
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈