डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “तुझ्या प्रेमात रमले…” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
☆
नव्या एका दुनियेत
मन माझे विहरले
हळू गालात हसता
रूप पुन्हा बहरले
*
जग भासते सुंदर
उणे न काही वाटते
चारीदिशा प्रितगंध
प्रेम मनात दाटते
*
थंड हवेची झुळूक
अंगी शहारे आणले
प्रिया बावरी मी झाले
तुझ्या प्रेमात रंगले
*
आठवता गोड क्षण
स्वर जणु कानी येतो
त्याचा पाठलाग मला
सैरभैर रानी नेतो
*
तुझ्या प्रेमात रमले
विसरले तृष्णा भूक
ओठ मिटून घेतले
शब्द झालेयात मूक
*
भाव माझ्या मनातले
बघ गीत जसे जमले
सात जन्म साथ हवी
तुझ्या प्रेमात रमले
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈