डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “कविता माझी ओळख…” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
☆
सखी जीवाभावाची ती
अभिव्यक्ती कवितेची
शब्द मळा फुलविते
गोडी मज व्यासंगाची
*
बळ देई झुंजण्याचे
संकटाशी तो सामना
मिळे स्फूर्ती नी चैतन्य
पूर्ण करीते कामना
*
अश्रू पुसे दुःखितांचे
घाली मायेची फुंकर
बळ देई जगण्याचे
वाट उजळी धूसर
*
शृृंगारते नवी नवी
न्हाते ती नवरसात
बाज लावणी ठसका
वीरगाथा पोवाड्यात
*
दिला मान व सन्मान
विशेषण कवयित्री
माझी ओळख कविता
तिचा ध्यास दिन रात्री
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈