श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गझल पंचमी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
[वृत्त..आनंदकंद]
☆
गाता मला न आले घेऊन ताल गेले
आले नवे गुलाबी इरसाल साल गेले
*
खोट्यास मी म्हणालो खोटे कुठे बिघडले
देऊन दोष मजला फुगवून गाल गेले
*
राबून पाहिले पण फळ नेमके मिळेना
गाभा कुणी हडपला ठेवून साल गेले
*
काळापुढे कुणाचा काही उपाय नाही
रेट्यात त्या क्षणांच्या कित्येक लाल गेले
*
उधळावयास माझ्या अटकाव खास होता
तट्टू म्हणून मजला ठोकून नाल गेले
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अप्रतिम गझल.