श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ संभ्रम… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

लळा जिव्हाळा प्रेम आंधळे ठरले आहे

द्वेषाने तर सुंदर जगणे मळले आहे

*

स्वर्ग कोणता नरक कोणता नाही ठावे

जग सगळे का भ्रमात असल्या रमले आहे

*

उपदेशाचे डोस पाजणे सोपे असते

स्वार्थ सोडणे कधी कुणाला जमले आहे

*

नाही कळले कोण येथला परोपकारी

लुबाडण्याला घबाड जग हे टपले आहे

*

मी तू मधला भेदभावतर कायम असतो

भलेबुरे पण या भेदाने घडले आहे

*

स्वत्वासाठी तत्व येथले गहाण पडते

गुपीत वेगळे यात कोणते दडले आहे

*

जगण्या मधला संभ्रम येथे कायम सलतो

याच सलाने जगण्याला ही छळले आहे

(अनलज्वाला)

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments