श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 282
☆ झुकली माफी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अपराध्याला कुठली माफी
माफ करुन त्या फसली माफी
*
अपराधी तो मोठा होता
समोर त्याच्या झुकली माफी
*
त्या नेत्याने मागितलेली
ती तर होती नकली माफी
*
दुष्ट कर्म हे किती घृणास्पद
त्याला पाहुन विटली माफी
*
शतकवीर तर तू अपराधी
पुन्हा मागतो कसली माफी
*
गुन्हेगार मी नव्हतो तरिही
माझ्यावरती रुसली माफी
*
तूच अता तर मला माफ कर
असेच काही म्हटली माफी
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈