कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 37 ☆
☆ दिस सर्वे सारखे नसतात… ☆
रडणे लहानपणी शोभते
पडणे लहानपणी शोभते…
रडता लहानपणी अश्रू पुसल्या जातात
पडता लहानपणी उचलण्या हात पुढे येतात…
डोळ्यांत अश्रू, बालपणीच शोभतात
मोठेपणी त्यास, षंढ सर्वे समजतात…
बालपणी पडता, प्रत्येक जण हळहळतो
मोठेपणी पडता, अव्हेर तो सतत होतो…
बालपणी रडता, चॉकलेट मिठाई मिळते
मोठेपणी रडता, आहे ते पण सरते…
लहानपणी पडता, मायेची फुंकर सुखावते
मोठेपणी पडता, अडगळ वाटायला लागते…
सांगायचे इतकेच, दिस सर्वे सारखे नसतात
सुकोमल हाताला सुद्धा, रट्टे-घट्टे पडतात…
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈