सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ कवितेचा उत्सव ☆ मी कोण ? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
प्रश्न मला पडतो नेहेमी
आहे तरी कोण मी
माणूस म्हणून जगतेय खरी
पण देवाची हो काय हमी?
आहे मुलगी, आहे पत्नी
आहे आणि आई
बहीण, मावशी, आत्या
आणि असेच काही-बाही.
पण उपयोग माझा काय
हे आत्ता कळतंय जराजरा
देवाजीच्या मनात काय
तो अर्थ कळतोय आत्ता खरा.
मी म्हणजे एक मोठा दगड
पण नाही साधासुधा
खापर फोडण्यासाठीच
करतात
वापर सगळे सदा.
पण महती माझी मलाच ठाऊक
मी नगण्य नाही मुळी
माथी नारळ फोडून घेणाऱ्या —
देवळामधल्या दगडाची
मी बहीण जणू हो जुळी||
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
फारच छान कविता. अतिशय अर्थपूर्ण.