कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 38 ☆ 

☆ महिमा भक्तीचा… ☆

(अष्ट-अक्षरी… काव्य)

(सदर रचनेमध्ये दोन दुवे आहेत… एक अष्ट-अक्षरी.. आणि दुसरे… अंत्य-ओळ…)

कसे सांगू सांगा तुम्ही

गोड महिमा भक्तीचा

भक्ती-विना होत नाही

मार्ग मोकळा मुक्तीचा…०१

 

मार्ग मोकळा मुक्तीचा

करा धावा श्रीप्रभुचा

तोच आहे वाली आता

अन्य कोणी न कामाचा…०२

 

अन्य कोणी न कामाचा

सर्व लोभी आहेत हो

अर्थ असेल तरच

मैत्री, ती  करतात हो…०३

 

मैत्री, ती करतात हो

धर्म हा लोप पावला

अंध-वृत्ती वर आली

सुज्ञ इथेच  वेडावला…०४

 

सुज्ञ इथेच  वेडावला

पाश-मोह आवळला

जाण इतुकीही न आता

ज्ञान-दीप मावळला…०५

 

ज्ञान-दीप मावळला

राज सहज बोलला

कृष्ण-भक्ती, ही सोज्वळ

स्मरा त्या श्रीगोविंदाला …०७

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments