श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ कवितेचा उत्सव ☆ कोरोना: काही बाही ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मूळ हिन्दी लेखन- घनश्याम अग्रवाल : मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर)
[1]
करोनामुळे कविसंमेलने रद्द झाली.
(कवींसाठी वाईट बातमी)
आता हे कवी कविता लिहू लागले.
(कवितांसाठी चांगली बातमी.)
[2]
कविसंमेलने रद्द झाली
जगता जगता कवी मेला.
रद्द नाही, पुढे ढकलली.
मरता मरता कवी जिवंत झाला.
[3]
संयम आणि सावधानीची
लक्ष्मणरेषा
तुम्ही उल्लंघू नका.
कोरोना रावण
स्वत:च लंघून येईल
आणि भस्म होऊन जाईल.
[4]
लग्नाच्या रात्री नवी नवरी
नवर्याला सोडून घरातून पळाली.
कारण?
साबणाने हात न धुता
नवर्याने नवरीचा घुंघट
उचलण्याचं साहस केलं होतं.
[5]
एक मीटरचं अंतर
नहमीच ठेवा दोघात.
एक दुसर्याचा स्पर्श नको.
म्हणजे आपण कोरोनापासून
आणि देश लोकसंख्या-विस्फोटापासून
दोघेही वाचाल.
मूळ रचना – श्री घनश्याम अग्रवाल
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर रचना
उज्ज्वला माईंची अनुवादित कविता आवडली. शेवटी दाहक वास्तव मांडणारी कविता