श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – एकदा एक सज्जन माझ्या घरी आले ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकदा एक सज्जन माझ्या घरी आले
कविसंमेलनाला चला, टी.ए. डी ए. देईन म्हणाले.
मी म्हणाले, ‘छान छान कवितेचे भाग्य उजळले
कवी मंडळींनाही आता बरे दिवस आले.’
माळ्यावर चढले, ट्रंक उघडली.
बाड काढले, धूळ झटकली.
टाळीच्या कविता शोधत, निवडत संमेलन स्थळी आले. …
एकदा एक सज्जन…
दारात होते किती रसिक आणि दर्दी
मागाहून कळले, ती सारी कवींचीच गर्दी
कवींनी घेरले, मंडपात नेले
रिकाम्या खुर्चीत नेऊन बसवले. ….
एकदा एक सज्जन…
इतक्यात ते सज्जन आले आतून
म्हणाले, ‘खुर्चीला यांना टाका खिळवून
शंभर कविता ऐकवा मोजून
शंभर रुपये , टी.ए. डी ए.चे यांना उगीच नाही दिले.’ ….
एकदा एक सज्जन…
सज्जन मग कवींकडे वळून
म्हणाले, ‘आता माझे दहा -दहा रुपये, टाका बर देऊन’
शंभर कवींकडून दहा -दहा रुपये घेऊन
हजार रुपये खिशात टाकून, सज्जन गेले निघून
शंभर कवी आणि मीच तेवढी बापडी श्रोती तिथे उरले ….
एकदा एक सज्जन…
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈