श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – अशी ही होळी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
आतंकवादा ची लाकडे
जातीयवादा च्या गोवऱ्या
धर्मांधतेचा घालून नारळ
तिरस्काराची टाकून गोळी
पेटवाहो जागोजागी होळी
अर्पण करू तिला द्वेषाची माळ
सदभावनेची घालून त्यात राळ
मोठा होउ द्या एकात्मतेचा जाळ
रुजवू संयमाने माणुसकीची नाळ
पारिवारिक स्नेहा ची पुरणपोळी
वर आत्मियतेेच्या तुपाची धार
कर्तव्य परायणतेचा कडकं वडा
वर आपुलकीची थंडाई गारेगार
परंपरा संस्कृतीचा तो वरणभात
संगीत ,नृत्य,विनोदाची ती चटणी
आग्रहाचा पापड ,स्नेहाचे लोणचे
मग रंगेल होळीची ती मेजवानी
संतांच्या शिकवणीचा तो गुलाल
लावून रंगू ,धरू ताष्यावर ताल
भिजूनचिंब पिऊ हो प्रेमाची भांग
आनंदात होळीच्या होऊ सारे दंग
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈