सुश्री शिल्पा मैंदर्गी
(आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणास्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया है कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। नेत्रहीन होने के पश्चात भी आपमें अद्भुत प्रतिभा है। आपने बी ए (मराठी) एवं एम ए (भरतनाट्यम) की उपाधि प्राप्त की है।)
☆ कवितेचा उत्सव ☆ हिमालय ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
ओढ लागली हिम शिखरांची .
देव भूमीच्या ऐश्वर्याची
गिरी शिखरांच्या सौंदर्याची
हिम राशींच्या वर्षावाची ॥ धृ ॥
ऋषीमुनींच्या पदस्पर्शाची
गंगेच्या त्या दिव्य जलाची.
पार्वतीच्या तपोभूमी ची
अन् शिवशंभूच्या भेटीची
हिमालयाच्या भव्यतेची, दिव्यतेची, उतुंगतेची ॥ १ ॥
हिम शिखरांची उंची गाठता
मी पण माझे गळून जावे
देवभूमीच्या दिव्यदर्शनी
स्वत्व माझे सरून जावे
गिरीशिखरांच्या सौंदर्याने
गर्वाचेही गर्व हरण व्हावे.
ऋषि मुनींच्या पदस्पर्शाने
जीवन माझे पावन व्हावे ॥ 2 ॥
शुभ्र हिमकण पडता गाली
सर्वस्वाचे भान हरावे
हिमराशींच्या वर्षावाने
निसर्गाशी समरस व्हावे.
पाहुनी शुभ्र हिमकळ्या
हिम देवीचे मन पुलकीत व्हावे.
गंगेच्या त्या दिव्य जलाने
विचारधन अभिमंथित व्हावे ॥ 3 ॥
पार्वतीसम तप आचरिता
शिवशक्ति चे मिलन व्हावे
शिवशंभूच्या भेटीने जिवाशिवाचे ऐक्य घडावे
अनुभूती येण्या रिमालयाच्या
भव्यतेची
दिव्यतेची
उतुंगतेची
मन माझे शिवशंकर व्हावे
शिवशंकर व्हावे.
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈