मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असा बॅरिस्टर झाला ☆ श्री गौतम कांबळे

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

☆  कवितेचा उत्सव ☆ असा बॅरिस्टर झाला ☆ श्री गौतम कांबळे ☆

परंपरेच्या जोखडाखाली समाज दबून गेला

जेंव्हा  समाज दबून गेला

आधार देण्या दीनास भीम वकील होऊन आला

असा बॅरिस्टर हो झाला

 

पिता रामजी माता भिमाई

आली फळाला तयांची पुण्याई

गुलामगिरीचा कर्दनकाळ लढाया सिद्ध हो झाला

 

बुद्ध कबीर फुले हे गुरु

शाहु सयाजी बनले तारु

बुद्धीमत्तेने विश्वात साऱ्या चमकला तेजाचा गोळा

 

अन्यायाचा प्रतिकार करावा

हक्कासाठी संघर्ष करावा

शिक्षणाने होतो विकास खरा भीम आम्हाला सांगूनी गेला

 

शैक्षणिक सामाजिक तो न्याय

राजसत्तेविना मिळणार नाय

देऊनी संदेश मुडद्यांच्या अंगी स्फुल्लींग पेरून गेला

 

बुद्ध धम्माचा करुन स्विकार

शिकविला तो शुद्ध आचार

संविधानातूनी देशाला या समता विचार दिला

 

©  श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈