☆ कवितेचा उत्सव ☆ मी ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
ऋचा वेदनेची मी,
साक्षेपी व्यथेचा वेद.
मूर्तिमंत यातनांचा,
मी कृतार्थ प्रवाही स्वेद.
सावरुन सर्व किनारे,
मी व्रतस्थ कालसरिता.
दैनंदिनीत स्वैरमुक्त,
तरी बंदिस्त मी कविता.
© श्री शरद कुलकर्णी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मस्तच कविता