श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
शिक्षक व साहित्यिक
शिक्षण: DTM (Diploma in Textile Manufacturing), M.A. (English), M. Ed. (English), DSM (Diploma in School Management),
गुण नैपुण्य : काव्य लेखन, ललित लेखन, वक्तृत्व, चित्रकला, गायन, वादन.
विशेष : 1) विविध साहित्य संमेलनांत निमंत्रित कवी. 2) साहित्य संमेलनाचे आयोजन.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडींवर सातत्याने ललित व काव्य लेखन. जिल्हास्तरावर शैक्षणिक प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका.
मिळालेले पुरस्कार : (शिक्षण क्षेत्र) – 1) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – साई समर्थ फौंडेशन, जयसिंगपूर 2) जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सांगली 3) शिक्षकांची नवोपक्रम स्पर्धा (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) – राज्यस्तरावर निवड
नेशनल बिल्डर अॅवार्ड – इनरव्हील क्लब, सांगली गुणवंत शिक्षक पुरस्कार – केंद्र, बेडग कलाश्री पुरस्कार – चाणक्य नॉलेज अवर्स, कुरूंदवाड कलाभूषण पुरस्कार – स्वामी विवेकानंद आर्ट पावर
साहित्य क्षेत्र पुरस्कार :
- महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार : जी. एस. प्रतिष्ठान (महाराष्ट्र – कर्नाटक)
- राज्यस्तरीय नवसाहित्य रत्न प्रतिष्ठा गौरव पुरस्कार : प्रतिष्ठा फौंडेशन
- राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार : कोल्हापूर
- राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार : (पुस्तक : संस्कारांची सापशिडी) – ध्यास साहित्य संमेलन, पलूस
- राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार : (काव्यसंग्रह : ओळंबा) – शब्दांगण साहित्य संमेलन, मिरज
- दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमसा) विशेष ग्रंथ पुरस्कार – काव्यसंग्रह ”ओळंबा”
- अग्रणी विशेष काव्यसंग्रह पुरस्कार : (काव्यसंग्रह-ओळंबा) अग्रणी प्रतिष्ठान, देशिंग.
- उत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार : (काव्यसंग्रह-ओळंबा) ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, पलूस.
सन्मानपत्र : (बालसाहित्य-चौदाखडीची गाणी) अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच, सांगली.
प्रकाशित साहित्य ग्रंथ : 1) चला बनूया चित्रकार – बालसाहित्य 2) पहिला पाऊस – ललित संग्रह 3) संस्कारांची सापशिडी – बालसाहित्य 4) बाराखडीची गाणी – बालसाहित्य 5) ओळंबा – काव्यसंग्रह 6) चौदाखडीची गाणी – बालसाहित्य
☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊस होता होता ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆
थेंबात पावसाच्या होते आग वेडी
जाळूनिया स्वतःला ती होते पाऊस थोडी
पाऊस होताच मग ती फिरते माळ रानी
कानात डोंगराच्या घुमतात गुज गाणी
दुःख शुष्क तृणाचे सरते उजाड रजनी
पाकळ्यांच्या दर्प ओठी ती होऊन जाते लाली
तालात या पिकांच्या ती पेरते नृत्य बोली
ओंजळीत आयुष्याच्या सजतात फुल वेली
पाऊल वाट तिच्याने होते अबोल थोडी
गंधाळल्या चराची ती वाट नागमोडी
चोचीत पाखरांच्या ती गाते गीत अंगाई
पिलास छत्र देई ती होऊन जाते आई
खिन्न त्रासल्या जीवाची काढते ओढून ढलपी
ती जाते देऊन देहा नितळ नवेली कांती
पाऊस होता होता ती बोलते पाऊस वाणी
का आग तिला म्हणावे सांगेल मज कोणी?
© श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
मिरज, जि. सांगली
मोबाईल : 9922048846
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सृजनशीलतेची कविता.