श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ श्रावण-गारवा ☆ श्रीशैल चौगुले ☆
(वृत्तः बालानंद)
गोड गारवा रमे जसा
त्यात पारवा घुमे कसा.
वारा मजेत गात गीत
तारां सवेत पावा नित
कृष्णा वाजवी सूर तसा
गोड गारवा रमे जसा .
हिरव्या माळा रंग भरी
हिरवी पाने ताल धरी
हरित पाखरे कानोसा
गोड गारवा रमे जसा.
पुलकित लोचन दिप तेवण
मनात हर्षित मानव वन
आला श्रावण रिम-झिमसा
गोड गारवा रमे जसा.
ऊन-पाऊस खेळ घडे
इंद्रधनू षी चहूकडे
ओढा वाहे चाळ तसा
गोड गारवा रमे जसा.
फुलपाखरेच फुलां वरी
भृंगर गुंजन नाद धरी
सृष्टी भास तव स्वर्गी तसा
गोड गारवा रमे जसा.
नाग पुजा सण पंचिम नृत्य
धरेवर हेच अंतिम सत्य
नभ घन नाचे शिवा तसा
गोड गारवा रमे जसा.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈