श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ चंद्र माझा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
शांत आहे झोपलेला चंद्र माझा
स्वप्न बघण्या गुंतलेला चंद्र माझा
मालकीचा मानते मी फक्त माझ्या
मी करांनी झाकलेला चंद्र माझा
पाहताना राग आला कैक वेळा
चांदण्यांनी वेढलेला चंद्र माझा
या तुम्हीही कौतुकाने पाहुनी जा
दावते मी जिंकलेला चंद्र माझा
श्वास आहे ध्यास आहे प्राणआहे
काळजातच कोंडलेला चंद्र माझा
सावराया साथ देतो हात देतो
सोबतीने वाढणारा चंद्र माझा
भाग्य आहे थोर माझे मानते मी
छान आहे लाभलेला चंद्र माझा
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈