☆ कवितेचा उत्सव ☆ सखी ☆ श्री यशवंत माळी ☆
सखी
आयुष्यभर आपण
पुरवलेच ना
देहाचे डोहाळे ?
चांगलं -चुंगलं खायला
प्यायला ?
निदान ब-यापैकी.
रंग रंगोटीसाठी
जमेल तेवढी
कॉस्मेटिक्स.
कपडे अन् दागिने.
आता काय?
चेहऱ्यावर वर्दळ
सुरकुत्यांची.
आणि सैल बुरख्यासारखे
लोंबणारे कातडे
……शरीरभर.
काय करायचं या देहाचं?
आग्नीला स्वाहा…..?
…..मूठमाती?
की देहदान ?
© श्री यशवंत माळी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈