श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ संस्कृतीची लेणी ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
आज तू नाचतेस
रिमिक्सच्या तालावर
माझ्या कानी मात्र
नाद पैंजणाचा !
कपाळावर टेकलीस
कागदी चंद्रकोर
भाळी तुझ्या शोभे
रेखीव रक्तचंद्र !
घड्याळ वा ब्रेसलेटने
खुलत नाहीत हात
चुड्याचा किणकिणाट
जीवनाचा रंग हिरवा !
एकविसाव्या शतकातले
स्वीकार तू बिनधास्त
संस्कृतीच्या लेण्यानांही
जपून ठेव उरात !
ही लेणी म्हणजे
आहेत अमर ज्योती
युगायुगांची नाती
लपली त्यामधी !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈