श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ बैलपोळा ☆ श्रीशैल चौगुले ☆
राजा मातीतला
पूजा बैलपोळा
कष्ट जुंपणीत
थोर साधाभोळा.
ओझे नांगराचे
वा ‘जु’ गाडीगोळा
नसे जन्मशीण
सेवा रानमाळा.
काय आठवणी
सांगू देवशाळा.
नाही बैलावीन
मृत्यू जन्मकळा.
नत् चरणांशी
माया कुरवाळा.
नाते सोबतीचे
संसारा ऊबाळा.
डोले पिकपाणी
श्रेय बैलदळा
सण आनंदाचा
धन्य बैलपोळा.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈