श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
कवितेचा उत्सव
☆ आगमन ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
तयारी आगमनाची
सज्ज जाहली भारतनगरी
गणरायाच्या आगमनाची
सुरु जाहली तयारी।।ध्रु.।।
दुकाने सजली मुर्ती
अन् आभुषणांनी
लहान मोठ्या वेगवेगळ्या
आकाराच्या रंगीत मुर्तींनी।।१।।
लगबग लगबग हलती सारी
गल्लोगल्ली शेड मारती
माळा दिव्यांच्या लावुनी
रस्ते शुभोभित करती।।२।।
घराघरात सुरु जाहली
रंगरंगोटी, साफसफाई
भिंती सजल्या नक्षीदार
त्या वेगवेगळ्या कलाकृतींनी।।३।।
रजा मिळवण्या सुरू
जाहली विनवणी साहेबांची
बायकांचीही गडबड गडबड
तयारी पुजा प्रसादाची।।४।।
बघा गड्यांनो धरणीमाता
तिही सजली
हिरवा शालू नक्षीदार
तो जरीच्या वेलबुट्टीचा ल्याली।।५।।
रुप आगळे सुंदर
असे ह्या मुर्तींचे
आशिष देण्या धरेवरी
या तो मुर्तीरुप अवतरे।।६।।
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈