कवितेचा उत्सव
☆रमती गौराईच्या पूजनी ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
आईचा सांगावा ऐकून
माहेरवाशीण येई धावून
सख्या साऱ्या जमून
संसारी व्यथा सोडून
रमती गौराईच्या पूजनी
जाई जीवन उजळुनी ( १)
नेसून साडी नऊवार
लेवून नथ मोत्यांचा सर
माळून मोगऱ्याची माळ
शोभे चाफ्याचे फूल
रमती गौराईच्या पूजनी
जाई जीवन उजळुनी (२)
समजून नाती घेता
उमजून नव्या प्रेरणा
मेळवून जुन्या नव्या
सामावून घेत पिढ्या
रमती गौराईच्या पूजनी
जाई जीवन उजळुनी ( ३)
उणेदुणे जाती विसरून
अंगणी फुगड्या खेळून
झिम्मडती आनंदी होऊन
गाणी गौराईची गाऊन
रमती गौराईच्या पूजनी
जाई जीवन उजळुनी( ४)
© सौ. मुग्धा कानिटकर
सांगली
फोन 9403726078
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈