श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ मुक्तगंध ☆ श्रीशैल चौगुले ☆
फुलवीत जावे मनात आनंद
विसरुन दुःखी हृदयाचे स्पंद.
भावना आवेग आवरीत जावे
आवेशी न व्हावे जगणेचा छंद.
प्रारब्धाचे भोग जन्मांतरी योग
नको भवरोग इंद्रिये आक्रंद.
भक्तियाचा नाद अंतरीत साद
परमात्म बोध कायेशी संबंध.
स्मरावेत शब्द संतश्लोक ऋणा
त्या पाऊलखूणा मृत्यू मुक्तगंध.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈