श्री मुबारक उमराण
कवितेचा उत्सव
☆ तुझ्यामुळे……… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
आनंदी जगतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!धृ! !
बेधुंद या व्यथांना
शब्दांत खोलतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!१ !
लाथाडणा-याला
वठणीवर अाणतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!२!!
वैफल्या भावनांना
हर्षित करतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!३!!
अंधाऱ्या या वाटेवर
प्रकाश पेरतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!४!!
वादळ पाऊस धारा
झेलीत नाचतो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!५!!
हिरवेडोंगर झाडी
चैतन्य पहातो आम्ही
कविता तुझ्यामुळे !!६!!
संकटाचे घाव झेलीत
फुलासवे जगतो आम्ही
कविता तु्झ्यामुळे . !!७!!
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈