स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
जन्म – 1 ओक्टोबर 1919 मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆
☆ कवितेचा उत्सव ☆ कौसल्येचा राम…. – महाकवी ग.दि. माडगूळकर ☆ प्रस्तुति – श्री विकास मधुसूदन भावे☆
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनश्याम!
दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते,रूप ये पटास
राजा घनश्याम!
विणुनिया झाला शेला ,पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे राम नाम
राजा घनश्याम!
हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणुनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ?
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर
प्रस्तुति – श्री विकास मधुसूदन भावे
चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈