सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ नवरंगी दसरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆
पिवळ्या रंगाने आरंभ झाला,
शेवंती, झेंडू ने रंग भरला!
पीत रंगाची उधळण झाली,
पिवळ्या शालूत देवी सजली!
प्रसन्न सृष्टी हिरवाईने नटली,
दुसऱ्या माळेच्या दिवशी!
करड्या रंगाने ती न्हाली,
देवी तिसऱ्या माळेची !
चवथीची सांज केशरी
रंगात न्हाऊन गेली !
पाचवीची शुभमाळ,
शुभ्र पावित्र्याने उजळली!
कुंकवाचा सडा पसरला
देवीच्या सहाव्या माळेत!
आभाळाची निळाई दिसे,
दुर्गेच्या सातव्या माळेत!
गुलाबी, जांभळा आले
आठव्या माळेला !
शुभ रंगांची बरसात
करीत देवीला !
हसरा,साजरा देवीचा चेहरा,
खुलविला नऊ रंगाने !
सिम्मोलंघनी दसरा सजला,
झळाळी घेऊन सोन्याने!
© सौ. उज्वला सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈