श्री विजय गावडे
कवितेचा उत्सव
☆ शुभेच्छांचा महापूर ☆ श्री विजय गावडे ☆
गटांगळ्या मी खात आहे
थोपवू कवण्या उपायी
‘व्हाट्सअँप,’ रुपी ये खतायें
फेस आला फेसबुकी
पाहुनी अगणित फोटो
का सहावा जुल्म मी हा
अंगावरी येतात काटे
सुप्रभात ने होई सुरु दिन
अन ओघ लागे दिनभरी
नको तितक्या न नको तसल्या
मेसेजीस भाराभरी
जन्मदिन अन श्रद्धांजली च्या
येती मेसीजिस संगे
कोणी फोटो टाकी ऐसा
जन्मदिनी बापडा अंतरंगे
बरे नाही जीवास म्हणुनी
करावा आराम जरी हा
‘गेट वेल सून’ संदेशे
वैताग पुरता येई पहा हा
पस्तावतो होऊनी मेंबर
कळपांचा अशा काही
अर्धमेला होतसे वाचूनी
अर्थहीन सल्ले सवाई
असो उरली न आशा
यावरी कवणा उतारा
बदलतील वारे माध्यमे
अन बदलेल हा खेळ सारा.
© श्री विजय गावडे
कांदिवली, मुंबई
मो 9755096301
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈