श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कुलुप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

आजी नावाचं एक कुलुप

असतं बहुतेक घरात

किल्लीही त्याची असते

सर्वांच्याच खिशात !

कुलुप उघडण्याचा

असतो सदाच हुरुप

घेण्यासारखे आजीचे

असतेच खूप खूप !

कधी लाडीक हट्टाने

तर कधी कौतुकाने

किल्ली फिरवली जाते

हवे नको घेतले जाते !

आजीजवळ मात्र नसते

तिच्याच कुलपाची किल्ली

मायापाशात हरवलेली आजी

मूग गिळून गप्पच बसते !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments