श्री अमोल अनंत केळकर
कवितेचा उत्सव
☆ नेटकरी….. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
नेटकरी – ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित
(आदरणीय साने गुरूजींची माफी मागून ?)
आता करुनी डेटा आँन,
नको राहू दे कुठले भान
नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण
मिडीया चॅनेल उठतील
बातम्या सा-या पेरतील
‘मेटा-कुटीला’ सारे येऊन पेटवूया हे रान ?
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण
नेटक-यांची फौज निघे
‘पुढे ढकलणे ‘ चोहीकडे
विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान
पडून ना राहू आता
मारुया शाब्दिक लाथा
‘नेटकरीच’ कामकरी, भांडणावर ठाम
आता करुनी डेटा आँन,
नको राहू दे कुठले भान
नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण
( नेटकरी) अमोल ?
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com