महंत कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 61
☆ अभंग – अति तिथे माती ☆
अति तिथे माती
असू द्यावे चित्ती
टळेल विपत्ती, सहजची…०१
हाव नसे योग्य
त्रास होय सदा
येईल विपदा, आयुष्यात…०२
शुद्ध भाव ठेवा
योग्य तेच करा
सत्कर्म आचरा, मनोभावे…०३
आयुष्य तोकडे
आहे कलियुगी
भय जागोजागी, पसरले…०४
कुणीच कुणाचे
नाही इथे जगी
मन हे दो जागी, भटकते…०५
कृष्णभक्ती करा
अच्युत सोयरा
लगाम आवरा, हळूहळू…०६
कवी राज म्हणे
सत्संग स्वीकारा
जावे व्यवहारा, शुद्धभावे…०७
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈