श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ सावित्री ज्योत… ☆ श्रीशैल चौगुले ☆
अशी घडली माता
पेरुनी साक्षरता
दिवे तेवले ज्ञानी
ऊध्दार स्त्री जन्माचा.
शतके महान झाली
निर्भय शक्ती शिक्षण
भारतभूमीचे पुण्य
सावित्री नारी रक्षण.
जोतीचा हात धरुनी
अज्ञानी तिमीर तेजे
स्वातंत्र्या स्वप्न चाहुल
ईतिहास पान साजे.
मानवतेचाच ध्यास
अस्पृश्य निवारणता
भेद केवळ भ्रमिष्ठ
समता खरी क्षमता.
धन्य युग हे होआवे
थोरवी जिची ममता
देशभक्तीचे हे ऋण
आजही प्रेरिते भक्ता.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈