श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ ☆ माझी कविता ☆☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मूक रहावी माझी कविता
आक्रोश कशाला उगा करावा
दुःखाचेही पचवून डोंगर
संतोषाचा झरा वहावा.
प्रतिक्षेतली जणू आर्तता
बंद पापणीमधले पाणी
हुरहूर सारी मनात ठेवून
आनंदाची गावो गाणी.
आठवणींचा जपून ठेवा
जाण असावी तिला आजची
भविष्य उज्वल पहात जाईल
स्वप्ने सजवून कधी उद्याची.
लिहीले त्याने तसे म्हणूनी
मी ही का हो तसे लिहावे
पाऊल माझ्या कवितेचे ते
चुकूनही ना कधी घसरावे.
नकाच सांगू मजला कोणी
अशी असावी,तशी असावी
समईमधल्या वातीसम ती
तम सर्वांचा उजळीत जावी.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
पंडित! कविता खुप छान अााहे. मला अाावडली.खाालील ओळी अधिक अाावडल्या.”अााठवणींचा जपून ठेवा। जाााण असावी तिला अाजची।” अाणि “नकाच सााांगु मजला कोणी अशी असावी तशी असावी। समईमधल्या वााातीसम ती तम सर्वांचा ऊजळित जावी” खुप छाान.