श्री मुबारक बाबू उमराणी
☆ कवितेचा उत्सव : कळी ☆ श्री मुबारक उमराणी ☆
कळी गळाली फुल गळाले
गळाली सारी झाडांची पाने
रक्तरंजीतात कोकिळा मुकी
जीवन सुके अबोल गाणे
झाले ते मुके अंधारी रात्री
निशब्द धुके, कोणी लुटला
वारा सुटला भयान राती
पाय पडता, पाला कुटला
जागे झाले काटे चीत्कारीत
नाचले कळ्यांच्या त्या राशीत
तुडवीत तुडवीत गेले
सुगंध फुलांचा पित पित
निशब्द चराचर निशब्द
थांबले झरे, थांबला चंद्र
थांबले रातकिडे चंचल
थांबला ढगा अाड तो चंद्र
भकास वाणी, भकास गाणी
ढग थेंब अश्रूंची ती धार
अश्रूथेंबच, कोणी करेना
अन्यायाविरूद्ध प्रहार
© श्री मुबारक बाबू उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अचूक भाष्य.