श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
कवितेचा उत्सव
☆ वंदन करूया भारत भू ला… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
वंदन करुया भारतभूला
प्रिय अमुच्या या जन्मभूमीला //धृ//
प्रणाम अमुचा भुमातेला
रक्षण कर्त्या क्रांतिविरांना
टिळक, नेहरु, गांधी यांना
वंदन करुया नेताजींना //1//
नांदती येथे आनंदाने
हिंदू मुस्लिम बंधुत्वाने
राहती सारे एकोप्याने
लढती पहा ते सामर्थ्याने //2//
वारसा आम्हा संस्कृतीचा
इतिहास पहा दिव्यत्वाचा
शौर्य, पराक्रम शूर शिवबाचा
मंत्र मिळाला स्वातंत्र्याचा //3//
मान आम्हाला हिमालयाचा
तसा जिव्हाळा जलधारांचा
रक्षक आहे सामर्थ्याचा
सुजलाम सुफलाम भारतभूचा //4//
डौलत आहे सदा आमूचा
तिरंगी झेंडा सन्मानाचा
सदैव उन्नत माथा अमूचा
मनी असू द्या भाव क्रांतीचा //5//
© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण
पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606
संपर्क – 9420738375
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈