श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
संक्षिप्त परिचय
- सेवानिवृत्त प्राचार्य, महाराष्ट्र शासन द्वारा राज्य पुरस्कार से सम्मानित.
- रक्तदान कार्य मे विशेष योगदान हेतू डॉ. बद्रिप्रसाद श्रीवास्तव पुरस्कार तथा राज्य रक्त संक्रमण परिषद से सम्मानित. 50 बार रक्तदान तथा रक्तदान शिविरों का आयोजन.
- सामाजिक तथा संस्कृतिक संस्थाओं से संबधित. जेसीआय संस्था के पूर्व अध्यक्ष, लायन्स क्लब अध्यक्ष.
- Personality Development के राष्ट्रीय प्रशिक्षक. 500 से अधिक शिविरों मे मार्गदर्शन.
- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे में अभ्यास मंडळ सदस्य के रूप मे कार्य. पाठ्य पुस्तक निर्मिती मे योगदान.
- संताजी शिक्षण मंडळ के सहसचिव. एसपीएम माझी विद्यार्थी संघ के अध्यक्ष.
- वृत्तपत्र लेखन कार्य तथा आकाशवाणी से कई बार विभिन्न कार्यक्रमों की प्रस्तुति.
☆ कवितेचा उत्सव : कोरोना मी नाराज आहो तुझ्यावर ….. खरे आहे ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
कोरोना मी नाराज आहो तुझ्यावर …..खरे आहे,
पण तू जीव घेतो म्हणून नव्हे.
मित्रांच्या त्या कंपूत
सुख दुःखाच्या देवघेवित
रक्तसंबंधा पलीकडचा धीर अन् सांत्वनाची वाट
तू हिरावून घेतली ना रे…..
जिव्हाळ्याचा कंपू संपविलास की रे बाबा तू…..
मी नाराज नाही….. तुझ्यावर
की तू लग्न समारोह नीरस केले म्हणून.
पण दिवसरात्र राबणाऱ्या त्या माय माऊलीच्या मुखमंडला वरील श्रमपरिहाराचे निरागस हास्य तू हिरावून घेतले ना तू,
मी नाराज नाही तुझ्यावर
की तू सांस्कृतिक कार्यक्रम बंद केले म्हणून
पण त्या कलावंताच्या निरागस कलाना दाद देण्याच्या आनंदापासून वंचित केलेस ना तू
मी नाराज नाही तुझ्यावर
की तू आजारी करतोस आप्तांना
पण खांद्यावर हात ठेवून
लढ म्हणण्याचा हक्क हिरावून घेतला ना तू…..
मी नाराज नाही तुझ्यावर
की तू मृत्यू देतो म्हणून
पण मानवतेचा शेवटचा खांदा अन्
हृदयाच्या रुदनाने दिलेला मुखाग्नी हिरावून घेतलास ना तू…..
हो रे कोरोना मी नाराज आहे तूझ्यावर, तू जीवन संपवतो म्हणून नव्हे
जगण्याचा आत्माच संपविलास ना रे…..
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈