श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ भूमी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त :पादाकुलक)

इथे मुक्याने रडे हुंदका

ढळती अश्रू इथे कोरडे

जुन्यापुराण्या खपल्यांखाली

ओल व्यथांची खोल भळभळे !

धूसर अंधुक छाया त्यांच्या

केली ज्यांनी दिवेलावणी

कृतज्ञतेच्या ओठांवरती

आठवणींची अजून गाणी !

कधी जयाचे डिंडिम येथे

शारण्याचा डंख जिव्हारी

कधी नभांगण निर्मम येथे

बंदिवान हो गगनभरारी !

होय विस्मृती धनुर्धरांची

काळासंगे घावही भरले

बाणांचे पण उरात स्मारक

निगुतीने नित जपुन ठेवले !

प्रज्ञा प्रतिभा मानव्याचे….

विराट अद्भुत घडता दर्शन

दाटे गहिवर भुईस इथल्या

धन्य तिचा मग होई कणकण !

ही तर भूमी कविह्रदयाची

इथे दिशांचे रुजे तराणे

कवितेचे ये अंबर जन्मा

जन्मा येई कवी नव्याने !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments