श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ फक्त आमच्यासाठी……☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
रक्तबंबाळ पावलांनी
अजून किती शिवार चालायचय.
भ्रष्टाचारी गिधाडाना
अजून कुठवर पोसायचय.
चक्रात घालून माणसांचा चोथा खरणा-याना
आम्ही देशप्रेमी म्हणायचय.
वर लाल दिव्याची गाडी देऊन
त्यांना फिरायला वावरायला.
आमच्या साठी का त्यांच्या साठी……
कुणाची पिलावळ पोसायची आम्ही.
आमच्या पोराबाळांचे पाडून फाके.
अरे ! हा रिवाज आहे काय राजकारण्यांचा.
आई बाप बहिण भावाना गाढण्याचा.
करून खून लोकशाहीचा.
टेंभा मिरवत स्वातंत्र्याचा.
संगनमताने परस्पराना वाचवण्याचा.
आमच्या साठी का त्यांच्या साठी……
पाणी आता गळ्यापर्यंत आलंय.
जनतेला तर देशोधडीला लावलय.
आमच्या सौजन्याचं भांडवल केलंय.
पोट फुगून कुणाला अजीर्ण झालय.
खाल्लय तेवढं पचवून टाकलंय.
विकासाच तर मुंडकच छाटलय.
आभाळ सगळं चौबाजूनी फाटलय.
फक्त आमच्या साठी……..
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केलेली घणाघाती टीका या कवितेत केलेली आहे. राजकारणाचे प्रखर आणि वास्तववादी चिञ या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे