श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆
जीवन गाडीच्या प्रवास
संगे साथी नातीगोती।
सारे शोधात फिरती
थांबा सुखाचा जगती।।धृ।।
आले आले बालपण होई आनद उधळण ।
हौस मौजेला न तमा जीवनाचे हे कोंदण।
वाटे फिरूनिया यावी बालपणाची प्रचिती।।१।।
किशोर ,कुमार वयात मित्र मैत्रिणींची धुंदी ।
पंख आकांक्षाना फुटती जीवन घडण्याची संधी।
मोहापाशाचे हे फासे गळ रस्त्या रस्त्यावरती।।२।।
शहाणा तो धरीतसे योग्य वळणाची वाट
शिखर यशाचे मिळता जीवन नक्षत्राचा थाट।
काय वर्णावी माधुरी सहचारी तो सांगाती।।३।
रगं त प्रवासाला आली जीवन बागही फुलली।
चिमण्या पाखरांच्या संगे आज माऊली रंगली ।
काय आनंदाला ऊणे आली सागरा भरती।।४।।
पाहून पिलांची उड्डाण माता आनंदली ऊरी।
गरूडाची झेप जणू जाई यशाच्या शिखरी।
मनी सतावते पुन्हा चाहूल एकटेपणाची।।५।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105