सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ ? अभंग – वृक्षारोपण ?☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
बीज अंकुरले | मातीच्या कुशीत |
धरा कृपावंत | आनंदली ||
उन वारा पाणी | मिळण्या पोषण |
विश्वाचे अंगण | बीजा तुला ||
मुळे घट्ट ठेवी | झेप घे अंबरी |
कर्तृत्व अंतरी | ठेवी सदा ||
आला पावसाळा | वसुंधरा दिन |
रोपे जगविन | जीवेभावे ||
झाडे बहुमोल | धन धान्य देती |
शुध्द हवा देती | जगण्यास ||
निसर्गाचा तोल | झाडे ही राखती ।
सोबती | आपुलेची ||
धरित्रीची माया | मिळे झाडातून |
समृद्धी देऊन | कृपा करी ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈