कै. विंदा करंदीकर
कवितेचा उत्सव
☆ फूलवेडी ☆ कै. विंदा करंदीकर ☆
(कै. गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’)
(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)
एक परी
फूलवेडी
फुलासारखी
नेसते साडी.
फुलामधून
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.
बिचारीला
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.
कवी – कै. विंदा करंदीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈