सुश्री सुमन किराणे
परिचय
जन्म-5/7/1949
शिक्षण – एम.ए.बी एड्.(डबल)
निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रयत शिक्षण संस्था
10पुस्तके प्रसिद्ध, दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर
कवितेचा उत्सव
☆ आनंद तरंग ☆ सुश्री सुमन किराणे ☆
मुठी एवढ्या हृदयात
सागरा एवढी दुःखं
ठाण मांडून बसली
तेव्हां दःखं
मुठी एवढी झाली नाहीत
पण
हृदय मात्र
सागरा एवढं झालं
त्याला हेलावून टाकणाऱ्या
महाभयंकर लाटा उठल्या
पण
कोणत्याही आपत्तिनं
हृदय सागर डगमगला नाही
त्याना तोंड देता देता
दुःखाना सुखं बनविण्याची
ताकत मात्र त्याच्यात निर्माण झाली
दुःखात सुख मानत जाईल
तसतसं
दुःखांची ओहोटी सुरु झाली
आणि सुखांची भरती येऊ लागली
होता होता
आता
सारी सुख,दुःखं
त्या सागरात विरुन गेलेत
हृदय सागर स्थिर झा लाय
आता
त्या हृदय सागरावर दिसतात
ते फक्त
आनंद तरंग
© सुश्री सुमन किराणे
पत्ता – मु.पो. हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.
मोबा.9850092676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈