श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
ती,ती,ती आणि ती सुद्धा…
श्री प्रमोद वामन वर्तक
शब्दांच्या झुल्यावर
झुलते ती कविता
वृत्तांच्या तालावर
नाचते ती कविता
भाव मनातले
जाणते ती कविता
जखम हृदयात
करते ती कविता
शब्दांशी खेळत
हसवते ती कविता
घायाळ शब्दांनी
रडवते ती कविता
साध्या शब्दांनी
सजते ती कविता
वेळी अवेळी
आठवते ती कविता
मनाचा गाभारा
उजळवते ती कविता
जखम बरी करून
व्रण ठेवते ती कविता
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈