सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

अभंग ( ६ ६ ६ ४ )

सप्तरंगी न्हावे । आनंदी नांदावे ।

सौख्याने सांधावे । आयुष्याला ।

 

तिळ तिळ घ्यावे । मण मण द्यावे ।

सत्पात्री करावे । दान अंतरी ।

 

दुःख विसरावे । सुख मिरवावे ।

 मन सावरावे । आनंदाने।

 

सूर आनंदाचे । सुरात छेडावे ।

सूर सापडावे ।  आपलेसे ।

 

सडा शिंपडावा । माती मुरवावा ।

मनाला ओलावा । मातृत्वाचा ।

 

एकरूप व्हावे | कर्तव्य करावे ।

अभंग रहावे । संसारात ।

 

फुले आयुष्याची | फुलावी मनाने |

 माळावी सुखाने |  सुगंधीत ।

 

देवाचीये दारी । मन लीन व्हावे ।

नाम मुखी यावे । पांडुरंगा ।

 

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Hemant Shah

Khupch chan kavita pallavi