महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 77
☆ अभंग… सरले दिवस, आता आठवणी ☆
बाल्य अवस्थेचा, आठवांचा मेळा
पुन्हा करू गोळा, सहजची…!!
शाळेत जातांना, मस्ती करतांना
ठेचं लागतांना, रडू येई…!!
मास्तरांचा मार, वाटतो कहर
मनाचा नकार, शिकण्याचा…!!
पाटीचे फुटणे, बाबाचे मारणे
मित्रांचे टोमणे, आठवूया…!!
गुडघे फुटती, ढोपरे सोलती
डोळे ही रडती, कधीकधी…!!
पावसाचे येणे, रिपरिप वाढे
जोर तो चढे, खेळण्याला…!!
आंबे बोरं चिंचा, जमाव करणे
स्वतःत रमणे, सर्वकाळ…!!
सरले दिवस, आता आठवणी
संग्रह जीवनी, प्रत्येकाच्या…!!
कवी राज म्हणे, आता मी थांबतो
स्वप्नात रांगतो, अंगणात…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खू प च छान