सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ दिला मी हात तुझ्या हाती… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
दिला मी हात तुझ्या हाती
मिटल्या अलवार नयनांच्या ज्योति
खोल मनीच्या डोहामध्ये उठले प्रितीचे तरंग
कावरी बावरी मी, झाले तुझ्यातच दंग
आश्वासक स्पर्श तुझा मोहला मनाला
ओढ तिव्र झाली झाले तुझीच राया
बोलला स्पर्श तुझा हळुवार गुज कानी
छेडली देहात अनंत तुझीच प्रित गाणी
एकांत लाभला आज मन झाले पिसापरी
तुझ्यासवे आसमंती घेईन गगन भरारी
पश्चिमेला मावळेल सुर्य आता केशर उधळीत
असाच हात हातात घ्यावास मावळतीच्या प्रवासात
हातावरील रेषे रेषेतून पाझरतोस तुच आता
हातावरील सुरकुत्यांचा असाच व्हावा सोहळा
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈