श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 104 – तरी तयाच्या पुसते वाटा ☆
फुलात मजला दिसतो काटा।
तरी तयाच्या पुसते वाटा।
आठवणींच्या हिंदोळ्यावर।
आज अचानक झुलती लाटा।
संस्कृतीस या स्वार्थांधांच्या।
स्वार्थाने या दिधला चाटा।
नात्यामधली विरली गोडी।
जेव्हा फुटला तयास फाटा।
प्रेमालाही तोलू पाहे।
प्रेमवीर हा दिसता घाटा।
अजब जगाची रीत साजना।
लाथ मारती भरल्या ताटा।
देश धर्मही धाब्यावरती।
अखंड करशी त्यांना टाटा।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈