सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पांडुरंग भेटीचा गं किती वियोग साहिला… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

कालचा त्या वादळात

संसार किती लोपले

हळहळे भक्तजन

उन्मळले वृक्ष ओले

पांडुरंग भेटीचा गं

किती  वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

मानवाचा हट्ट सारा

बाधा निसर्गचक्रात

आवडे ना प्रभू तुला

ध्यानस्थ तू एकांतात

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

जिवाणू तो विषाणू तो

धन्वंतरी तोच आहे

विसर पडला कसा

सर्वत्र तूच तू आहे

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

विठू तो लेकुरवाळा

भक्त रक्षिण्या गुंतला

थोपवी वादळ वारा

तेणे वाढ वेळ झाला

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

व्याकुळता संपवली

वारकरी तो धावला

उच्च स्वरे पंढरीत

जयघोष निनादला

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments